१ शमुवेल 9:16
१ शमुवेल 9:16 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)
“उद्या सुमारे या वेळेस बन्यामिनी प्रांतातून एक पुरुष मी तुझ्याकडे पाठवीन, आणि माझे लोक इस्राएल यांचा राजा होण्यास त्यास तू अभिषेक कर. तो पलिष्ट्यांच्या हातून माझ्या लोकांस सोडवील; कारण मी आपल्या लोकांकडे पाहिले आहे आणि त्यांची आरोळी माझ्याकडे आली आहे.”
१ शमुवेल 9:16 पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती (MRCV)
“याच वेळेस उद्या मी तुझ्याकडे बिन्यामीनच्या प्रदेशातील एक मनुष्य पाठवेन. माझ्या इस्राएल लोकांवर शासनकर्ता म्हणून त्याचा अभिषेक कर; तो माझ्या लोकांना पलिष्ट्यांच्या हातून सोडवेल. मी माझ्या लोकांकडे पाहिले आहे, कारण त्यांचा आकांत माझ्यापर्यंत पोहोचला आहे.”
१ शमुवेल 9:16 पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI) (MARVBSI)
“उद्या ह्या सुमारास मी तुझ्याकडे बन्यामिनी प्रांतातला एक मनुष्य पाठवीन, त्याला अभिषेक करून माझ्या इस्राएल लोकांवर अधिपती नेम; तो माझ्या लोकांना पलिष्ट्यांच्या हातून सोडवील; कारण माझ्या लोकांचे गार्हाणे माझ्याकडे आले आहे म्हणून त्यांच्याकडे माझी नजर गेली आहे.”