1 थेस्सल 2:13
1 थेस्सल 2:13 पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती (MRCV)
परमेश्वराचे आम्ही निरंतर आभार मानतो, कारण जेव्हा तुम्ही आमच्याकडून परमेश्वराचे वचन ऐकले, तेव्हा तुम्ही ते मानवाचे म्हणून नाही, परंतु परमेश्वराचे सत्यवचन म्हणून स्वीकारले, जे वास्तविकतेचे आहे आणि तेच तुमच्यामध्ये कार्य करीत आहे.
1 थेस्सल 2:13 पवित्र शास्त्र CL New Testament (BSI) (MACLBSI)
दुसऱ्या एका कारणासाठीदेखील आम्ही देवाचे निरंतर आभार मानतो. ते म्हणजे तुम्ही आमच्याकडून ऐकलेले देवाचे वचन स्वीकारले ते माणसांचे म्हणून नव्हे, तर देवाचे म्हणून स्वीकारले आणि वास्तविक ते तसेच आहे; कारण देव तुम्हां विश्वास ठेवणाऱ्यांत कार्य करीत आहे.
1 थेस्सल 2:13 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)
या कारणांमुळे आम्ही सुद्धा देवाची निरंतर उपकारस्तुती करितो की, तुम्ही आम्हापासून ऐकलेले देवाचे वचन स्वीकारले ते मनुष्यांचे म्हणून नव्हे तर देवाचे म्हणून स्वीकारले आणि खरे पहाता ते असेच आहे; ते तुम्हा विश्वास ठेवणाऱ्यात कार्य करीत आहे.
1 थेस्सल 2:13 पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI) (MARVBSI)
ह्या कारणांमुळे आम्हीही देवाची निरंतर उपकारस्तुती ह्यामुळे करतो की, तुम्ही आमच्यापासून ऐकलेले देवाचे वचन स्वीकारले ते माणसांचे म्हणून नव्हे तर देवाचे म्हणून स्वीकारले, आणि वास्तविक ते तसेच आहे; ते तुम्हा विश्वास ठेवणार्यांत कार्य करत आहे.