1 तीमथ्य 2:1-2
1 तीमथ्य 2:1-2 पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती (MRCV)
तर सर्वात प्रथम मी विनंती करतो की, सर्व मनुष्यांसाठी विनंत्या, प्रार्थना, रदबदल्या आणि उपकारस्तुती करावी. अशाच प्रकारे राजांसाठी आणि अधिकार्यांसाठी करावी, यासाठी की आपण पूर्ण सुभक्तीने व गंभीरपणाने शांतीचे व स्वस्थपणाचे आयुष्यक्रमण करावे.
1 तीमथ्य 2:1-2 पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI) (MARVBSI)
तर सर्वांत प्रथम हा बोध मी करतो की, सर्व माणसांसाठी विनंत्या, प्रार्थना, रदबदल्या व उपकारस्तुती करावी; राजांकरता व सर्व वरिष्ठ अधिकार्यांकरता करावी, ह्यासाठी की, पूर्ण सुभक्तीने व गंभीरपणाने आपण शांतीचे व स्वस्थपणाचे असे आयुष्यक्रमण करावे.
1 तीमथ्य 2:1-2 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)
तर सर्वांत प्रथम मी हा बोध करतो की, मागण्या, प्रार्थना, विनंत्या व आभारप्रदर्शन सर्व लोकांसाठी कराव्या. आणि विशेषतः राजांकरता आणि जे मोठे अधिकारी आहेत त्या सर्वांकरीता प्रार्थना करा, यासाठी की आपण पूर्ण सुभक्तीत व गंभीरपणात शांतीचे व स्थिरपणाचे असे जीवन जगावे.
1 तीमथ्य 2:1-2 पवित्र शास्त्र CL New Testament (BSI) (MACLBSI)
सर्वांत प्रथम मी असे आवाहन करतो की, सर्व माणसांसाठी विनंत्या, प्रार्थना व मध्यस्थी करावी आणि आभार मानावेत. राजांकरिता व सर्व वरिष्ठ अधिकाऱ्यांकरिता प्रार्थना करावी, ह्यासाठी की, पूर्ण भक्तीने व सदाचाराने आपण स्वस्थपणाचे व शांतीचे आयुष्यक्रमण करावे.