२ करिंथ 1:21-22
२ करिंथ 1:21-22 पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI) (MARVBSI)
जो आम्हांला अभिषेक करून तुमच्याबरोबर ख्रिस्ताच्या ठायी सुस्थिर करत आहे तो देव आहे; त्याने आम्हांला मुद्रांकित केले व आमच्या अंत:करणात आपला आत्मा हा विसार दिला.
२ करिंथ 1:21-22 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)
आता, जो आम्हास अभिषेक करून तुमच्याबरोबर ख्रिस्तात सुस्थिर करीत आहे तो देव आहे. तसाच त्याने आपल्यावर शिक्का मारला आहे आणि जो येणार आहे त्याबद्दलची खात्री म्हणून आमच्या अंतःकरणात आपला पवित्र आत्मा हा विसार दिला आहे.
२ करिंथ 1:21-22 पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती (MRCV)
आता हेच परमेश्वर जे तुम्हाला व आम्हाला असे आपणा दोघांना ख्रिस्तामध्ये स्थिर करतात. त्यांनी आमचा अभिषेक केला आहे, त्यांच्या मालकीहक्काचा शिक्का आमच्यावर मारला आहे आणि आमच्या अंतःकरणात पवित्र आत्मा ठेव म्हणून ठेवला आहे, जे येणार आहे त्याची हमी देत आहे.
२ करिंथ 1:21-22 पवित्र शास्त्र CL New Testament (BSI) (MACLBSI)
परंतु परमेश्वर आम्हांला तुमच्याबरोबर ख्रिस्तामध्ये स्थिर करतो व त्याने आमच्यावर अभिषेक केला आहे. त्याने आमच्यासाठी जे सर्व काही राखून ठेवले आहे, त्याची शाश्वती म्हणून आमच्या अंतःकरणात त्याने त्याचा आत्मा पाठवला आहे.