२ करिंथ 1:6
२ करिंथ 1:6 पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI) (MARVBSI)
आमच्यावर संकट येते ते तुमचे सांत्वन व तारण व्हावे म्हणून येते; आणि आम्हांला सांत्वन मिळते ते तुमचे सांत्वन व्हावे म्हणून मिळते; म्हणजे असे की, जी दु:खे आम्ही सोसतो, ती सहन करण्यास तुम्हांला सामर्थ्य मिळते.
२ करिंथ 1:6 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)
आणि आम्हावर संकट येते ते तुमचे सांत्वन व तारण व्हावे म्हणून येते आणि आम्हास सांत्वन मिळते ते तुमचे सांत्वन व्हावे म्हणून मिळते; म्हणजे असे की, जी दुःखे आम्ही सोशीत आहोत, ती धीराने सहन करण्यास तुम्हास सामर्थ्य मिळते.
२ करिंथ 1:6 पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती (MRCV)
जर आम्ही दुःखी आहोत तर ते तुमच्या सांत्वनासाठी व तारणासाठी; जर आम्हाला सांत्वन लाभले आहे, तर ते तुमच्या सांत्वनासाठी, यासाठी की जी दुःखे आम्ही सोसतो व जी तुम्हीही सोसत आहात, त्यामुळे तुम्हामध्ये धीर व सहनशीलता उत्पन्न व्हावी
२ करिंथ 1:6 पवित्र शास्त्र CL New Testament (BSI) (MACLBSI)
जर आमच्यावर संकट येते, ते तुमचे सांत्वन व तारण व्हावे म्हणून येते आणि जर आम्हांला सांत्वन मिळते, तर ते तुमचे सांत्वन करता यावे म्हणून मिळते, म्हणजे असे की, जी दुःखे आम्ही सहन करतो, तीच दुःखे धीराने सहन करण्यास तुम्हांला सामर्थ्य मिळावे.