२ करिंथ 5:15-16
२ करिंथ 5:15-16 पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI) (MARVBSI)
आणि तो सर्वांसाठी ह्याकरता मेला की, जे जगतात त्यांनी पुढे स्वत:करता नव्हे, तर त्यांच्यासाठी जो मेला व पुन्हा उठला त्याच्याकरता जगावे. तर मग आतापासून आम्ही कोणाला देहदृष्ट्या ओळखत नाही; आणि जरी आम्ही ख्रिस्ताला देहदृष्ट्या ओळखले होते तरी आता ह्यापुढे त्याला तसे ओळखत नाही.
२ करिंथ 5:15-16 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)
आणि सर्वांसाठी तो ह्यासाठी मरण पावला की, ह्यापुढे जे जगतील त्यांनी आपल्या स्वतःसाठी नाही, पण त्यांच्यासाठी जो स्वतः मरण पावला आणि पुन्हा उठला त्याच्यासाठी त्यांनी जगावे. म्हणून ह्यामुळे, आम्ही कोणाला देहावरून ओळखीत नाही; हो, आम्ही ख्रिस्ताला देहावरून ओळखले आहे तरी आता ह्यापुढे ओळखीत नाही.
२ करिंथ 5:15-16 मराठी समकालीन आवृत्ती (MRCV)
ते सर्वांसाठी मरण पावले, म्हणून आता जे जिवंत आहेत त्यांनी यापुढे स्वतःसाठी जगू नये, तर जे त्यांच्यासाठी मरण पावले आणि पुन्हा उठले, त्यांच्यासाठी जगावे. येथून पुढे जगीक दृष्टीने आम्ही कोणाकडे पाहत नाही. आम्ही ख्रिस्ताकडे त्यादृष्टीने पाहत होतो पण आता तसे पाहत नाही.
२ करिंथ 5:15-16 पवित्र शास्त्र CL New Testament (BSI) (MACLBSI)
तो सर्वांसाठी ह्याकरता मरण पावला की, जे जगतात त्यांनी पुढे स्वतःकरता नव्हे तर त्यांच्यासाठी जो मरण पावला व पुन्हा उठला त्याच्याकरता जगावे. तर मग आत्तापासून आम्ही कोणाचा मानवी मापदंडाने न्याय करीत नाही. जरी आम्ही ख्रिस्ताला एकेकाळी मानवी दृष्टीकोणातून ओळखले होते, तरी आता ह्यापुढे त्याला तसे ओळखत नाही.