२ राजे 2:9 - Compare All Versions
२ राजे 2:9 IRVMAR (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
आणि असे झाले की, नदी ओलांडल्यावर एलीया अलीशाला म्हणाला, “परमेश्वराने मला येथून घेऊन जायच्या अगोदर मी तुझ्यासाठी काय करावे ते माग.” अलीशा म्हणाला, “कृपाकरून तुमच्या ठायी असलेल्या आत्म्याचा दुप्पट वाटा मला मिळावा.”
सामायिक करा
२ राजे 2 IRVMAR२ राजे 2:9 MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
ते पार गेल्यावर एलीयाह अलीशाला म्हणाला, “मला तुझ्यापासून घेतले जाण्यापूर्वी मी तुझ्यासाठी काय करावे ते मला सांग?” “अलीशाने उत्तर दिले, तुमच्यामध्ये असलेल्या आत्म्याचा दुप्पट वाटा मला मिळावा.”
सामायिक करा
२ राजे 2 MRCV२ राजे 2:9 MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
ते पलीकडे गेल्यावर एलीया अलीशाला म्हणाला, “मला तुझ्यापासून नेण्यात येण्यापूर्वी मी तुझ्यासाठी काय करू ते मला सांग.” अलीशा म्हणाला, “आपल्या ठायी असलेल्या आत्म्याचा दुप्पट वाटा माझ्या ठायी यावा.”
सामायिक करा
२ राजे 2 MARVBSI