2 पेत्र 1:5-7
2 पेत्र 1:5-7 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)
ह्याच्या कारणास्तव तुम्ही होईल तितका प्रयत्न करून आपल्या विश्वासात सात्विकतेची, सात्विकतेत ज्ञानाची ज्ञानात इंद्रियदमनाची, इंद्रियदमनात सहनशीलता आणि सहनशीलतेला सुभक्ती, आणि सुभक्तीत बंधुप्रीतीची व बंधुप्रीती मध्ये प्रीतीची भर जोडा.
2 पेत्र 1:5-7 पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती (MRCV)
कारण याच कारणासाठी, तुमच्या विश्वासामध्ये चांगुलपणाची भर घालण्याचा प्रयत्न करा; चांगुलपणात ज्ञानाची; ज्ञानात आत्मसंयमाची; आत्मसंयमात धीराची; धीरात सुभक्तीची; सुभक्तीत बंधुप्रेमाची; बंधुप्रेमात प्रीतीची.
2 पेत्र 1:5-7 पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI) (MARVBSI)
ह्याच कारणास्तव तुम्ही होईल तितका प्रयत्न करून आपल्या विश्वासात सात्त्विकतेची, सात्त्विकतेत ज्ञानाची, ज्ञानात इंद्रियदमनाची, इंद्रियदमनात धीराची, धीरात सुभक्तीची, सुभक्तीत बंधुप्रेमाची व बंधुप्रेमात प्रीतीची भर घाला
2 पेत्र 1:5-7 पवित्र शास्त्र CL New Testament (BSI) (MACLBSI)
ह्याच कारणासाठी तुम्ही होईल तितका प्रयत्न करून आपल्या विश्वासात चांगुलपणाची, चांगुलपणात ज्ञानाची, ज्ञानात आत्मनियंत्रणाची, आत्मनियंत्रणात धीराची, धीरात धार्मिकतेची, धार्मिकतेत बंधुप्रेमाची व बंधुप्रेमात प्रीतीची भर घाला.