2 पेत्र 2:21-22
2 पेत्र 2:21-22 पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती (MRCV)
नीतिमत्त्वाचा मार्ग समजून आल्यानंतर आपणास दिलेल्या पवित्र आज्ञेकडे पाठ फिरवणे यापेक्षा तो मार्ग त्यांना माहीत झालाच नसता, तर ते त्यांच्यासाठी बरे झाले असते. अशा लोकांसाठी या म्हणी खर्या आहेत: “कुत्रा त्याच्या ओकारीकडे परत जातो,” आणि “धुतलेली डुकरीण तिच्या चिखलात लोळण्यास परत जाते,” अशा म्हणींप्रमाणे त्यांची गत झालेली असते.
2 पेत्र 2:21-22 पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI) (MARVBSI)
कारण नीतिमत्त्वाचा मार्ग समजून आल्यानंतर आपणांस दिलेल्या पवित्र आज्ञेकडे पाठ फिरवणे ह्यापेक्षा तो न समजणे ते त्यांच्यासाठी बरे होते. ‘आपल्या ओकारीकडे परतलेले कुत्रे’ व अंग धुतल्यानंतर गाळात लोळण्यास परतलेली ‘डुकरीण’, अशी जी खरी म्हण आहे तिच्यासारखी त्यांची गत झाली आहे.
2 पेत्र 2:21-22 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)
कारण त्यांना नीतिमत्त्वाचा मार्ग समजल्यावर, त्यांनी दिलेली पवित्र आज्ञा सोडून देऊन त्यांनी मागे फिरावे, हे होण्यापेक्षा, त्यांना त्याचे ज्ञान झाले नसते तर त्यांच्यासाठी ते बरे झाले असते. कारण कुत्रे आपल्या ओकीकडे पुन्हा फिरते आणि धुतल्या नंतर डुकरीण लोळण्यासाठी घाणीत शिरते, ही जी खरी म्हण तिच्याप्रमाणे हे त्यांना झाले आहे.
2 पेत्र 2:21-22 पवित्र शास्त्र CL New Testament (BSI) (MACLBSI)
नीतिमत्त्वाचा मार्ग समजून आल्यानंतर आपणास दिलेल्या पवित्र आज्ञेकडे पाठ फिरवणे ह्यापेक्षा तो मार्ग त्यांना माहीत झालाच नसता, तर ते त्यांच्यासाठी बरे झाले असते. ‘आपल्या ओकारीकडे परतलेले कुत्रे’ व ‘अंग धुतल्यानंतर चिखलात लोळण्यास परतलेली डुकरीण’, अशा ज्या म्हणी आहेत त्यांच्यासारखी त्यांची गत झालेली असते.