2 पेत्र 3:11-12
2 पेत्र 3:11-12 पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती (MRCV)
ज्याअर्थी सर्वकाही अशा रीतीने नष्ट होणार आहे, त्याअर्थी तुम्ही कशाप्रकारचे लोक असणे आवश्यक आहे? तुम्ही पवित्र आणि सुभक्तीत जीवन जगले पाहिजे. तो परमेश्वराचा दिवस लवकर यावा म्हणून तुम्ही त्याकडे लक्ष देत आहात, त्या दिवशी आकाश अग्नीत जळून विलयास जाईल आणि त्यातील मूलतत्वे उष्णतेने वितळतील.
2 पेत्र 3:11-12 पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI) (MARVBSI)
तर ही सर्व अशी लयास जाणारी आहेत म्हणून पवित्र वर्तणुकीत व सुभक्तीत राहून देवाचा दिवस येण्याची वाट पाहत व तो दिवस लवकर यावा म्हणून खटपट करत तुम्ही कशा प्रकारचे लोक असावे बरे? त्या दिवसामुळे आकाश जळून लयास जाईल आणि सृष्टितत्त्वे तप्त होऊन वितळतील.
2 पेत्र 3:11-12 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)
या सर्व गोष्टी जर लयास जाणार आहेत म्हणून तुम्ही पवित्र आचरणात व सुभक्तीत राहून देवाचा दिवस येण्याची वाट पाहत व तो दिवस लवकर यावा म्हणून खटपट करीत तुम्ही कशा प्रकारचे लोक असावे बरे? देवाच्या त्या दिवसामुळे आकाश जळून लयास जाईल आणि सृष्टितत्त्वे अत्यंत तापून वितळतील.
2 पेत्र 3:11-12 पवित्र शास्त्र CL New Testament (BSI) (MACLBSI)
ही सर्व अशी लयास जाणार आहेत, म्हणून पवित्र व धार्मिक जीवन जगून देवाचा दिवस येण्याची वाट पाहणारे व तो दिवस लवकर यावा म्हणून सर्वतोपरी प्रयत्न करणारे तुम्ही असावे. त्या दिवसामुळे आकाश जळून लयास जाईल आणि मूलतत्त्वे तप्त होऊन वितळतील.