२ शमुवेल 23:3-4 - Compare All Versions
२ शमुवेल 23:3-4 IRVMAR (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
इस्राएलचा देव हे बोलला, इस्राएलचा दुर्ग मला म्हणाला, “जो न्यायाने राज्य करतो, जो देवाविषयी आदर बाळगून राज्य करतो. तो मनुष्य सकाळच्या प्रकाशासारखा असेल, निरभ्र सकाळ असावी तसा असेल, पावसानंतर येणाऱ्या उन्हासारखा असेल. पाऊस कसा तर ज्याच्यामुळे जमिनीतून कोवळे गवत तरारून येते असा.
२ शमुवेल 23:3-4 MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
इस्राएलचे परमेश्वर बोलले, इस्राएलच्या खडकाने मला म्हटले: ‘जेव्हा एखादा मनुष्य न्यायाने लोकांवर राज्य करतो, जेव्हा तो परमेश्वराचे भय बाळगून राज्य करतो, तो सूर्योदयाच्या प्रकाशासारखा निरभ्र पहाटेच्या प्रभेसारखा, पाऊसानंतरच्या तेजाप्रमाणे जे भूमीतून गवत उगवते त्याप्रमाणे आहे.’
२ शमुवेल 23:3-4 MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
इस्राएलाचा देव म्हणाला, इस्राएलाचा दुर्ग मला म्हणाला, मानवांवर न्यायाने राज्य करणारा, देवाचे भय धरून त्यांच्यावर राज्य करणारा निर्माण होईल. सूर्योदयीच्या प्रभातेसारखा तो उदय पावेल, निरभ्र प्रभातेसारखा तो असेल, पर्जन्यवृष्टीनंतर सूर्यप्रकाशाने जमिनीतून हिरवळ उगवते तसा तो उगवेल.