2 थेस्सल 2:16-17
2 थेस्सल 2:16-17 पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती (MRCV)
ज्यांनी कृपेद्वारे आपल्यावर प्रीती केली आणि युगानुयुगाचे प्रोत्साहन व चांगली आशा आपल्याला दिली, ते परमेश्वर आपले पिता व स्वतः आपले प्रभू येशू ख्रिस्त, तुमच्या अंतःकरणास प्रोत्साहित करोत आणि प्रत्येक चांगल्या कृतीत आणि बोलण्यात तुम्हाला समर्थ करोत.
2 थेस्सल 2:16-17 पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI) (MARVBSI)
आपला प्रभू येशू ख्रिस्त हा, आणि ज्याने आपल्यावर प्रीती करून युगानुयुगाचे सांत्वन व चांगली आशा कृपेने दिली तो देव आपला पिता, तुमच्या मनाचे सांत्वन करो, आणि प्रत्येक चांगल्या कृतीत व उक्तीत तुम्हांला स्थिर करो.
2 थेस्सल 2:16-17 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)
आपला प्रभू येशू ख्रिस्त हा आणि ज्याने आपल्यावर प्रीती करून सर्वकाळचे सांत्वन व चांगली आशा कृपेने दिली तो देव आपला पिता, तुमच्या मनाचे सांत्वन करो आणि प्रत्येक चांगल्या कृतीत व गोष्टीत तुम्हास स्थिर करो.
2 थेस्सल 2:16-17 पवित्र शास्त्र CL New Testament (BSI) (MACLBSI)
आपला प्रभू येशू ख्रिस्त स्वत: आणि ज्याने कृपेद्वारे आपल्यावर प्रीती करून आपल्याला शाश्वत प्रोत्साहन व चांगली आशा दिली तो देव आपला पिता, प्रत्येक चांगल्या कृतीसाठी व उक्तीसाठी तुमची अंत:करणे प्रोत्साहित व बळकट करो.