प्रेषितांची कृत्ये 11:17-18
प्रेषितांची कृत्ये 11:17-18 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)
आपण प्रभू येशू ख्रिस्तावर विश्वास ठेवला तेव्हा जसे आपणांस तसे त्यांसही देवाने सारखेच दान दिले, मग देवाला अडविणारा असा मी कोण? जेव्हा त्यांनी या गोष्टी ऐकल्या, तेव्हा ते शांत राहिले, त्यांनी देवाची स्तुती केली आणि म्हणाले, “तर मग देवाने परराष्ट्रीयांसही जीवन मिळावे म्हणून पश्चात्तापबुद्धी दिली आहे.”
प्रेषितांची कृत्ये 11:17-18 मराठी समकालीन आवृत्ती (MRCV)
म्हणून जर परमेश्वराने तेच दान त्यांना दिले जे आपण प्रभू येशू ख्रिस्तावर विश्वास ठेवला तेव्हा आपल्याला मिळाले, तर परमेश्वराला विरोध करणारा मी कोण?” त्यांनी हे ऐकले, तेव्हा त्यांच्याकडे आणखी काही प्रश्न राहिले नाहीत आणि ते परमेश्वराची स्तुती करू लागले, ते म्हणाले, “तर आता परमेश्वराने गैरयहूदीयांनाही पश्चात्ताप करण्याची संधी दिली आहे ज्यामुळे त्यांना जीवन प्राप्त होईल.”
प्रेषितांची कृत्ये 11:17-18 पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI) (MARVBSI)
जेव्हा आपण प्रभू येशू ख्रिस्तावर विश्वास ठेवला तेव्हा जसे आपणांस तसे त्यांनाही देवाने सारखेच दान दिले; तर मग देवाला अडवणारा असा मी कोण?” हे ऐकून ते उगे राहिले आणि देवाचा गौरव करत बोलले, “तर मग देवाने परराष्ट्रीयांनाही जीवन मिळावे म्हणून पश्चात्तापबुद्धी दिली आहे.”
प्रेषितांची कृत्ये 11:17-18 पवित्र शास्त्र CL New Testament (BSI) (MACLBSI)
जेव्हा आपण प्रभू येशू ख्रिस्तावर विश्वास ठेवला, तेव्हा जसे आपणांस तसेच त्यांनाही देवाने सारखेच दान दिले, तर मग देवाला अडविणारा असा मी कोण?” हे ऐकून त्यांनी टीका करणे बंद केले आणि देवाचा गौरव करीत ते म्हणाले, “तर मग देवाने यहुदीतरांनाही जीवन मिळावे म्हणून पश्चात्तापबुद्धी दिली आहे.”