प्रेषितांची कृत्ये 2:45-46 - सर्व आवृत्त्यांची तुलना करा
प्रेषितांची कृत्ये 2:45-46 MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
ते आपापली जमीन व मालमत्ता विकून जसजशी प्रत्येकाला गरज लागत असे तसतसे सर्वांना वाटून देत असत. ते दररोज एकचित्ताने व तत्परतेने मंदिरात जमत असत, घरोघरी भाकर मोडत असत आणि देवाची स्तुती करत हर्षाने व सालस मनाने जेवत असत.
प्रेषितांची कृत्ये 2:45-46 IRVMAR (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
ते आपआपली जमीन व मालमत्ता विकून जसजशी प्रत्येकाला गरज लागत असे, तसतसे सर्वांना वांटून देत असत. ते दररोज एकचित्ताने व तत्परतेने परमेश्वराच्या भवनात जमत असत, घरोघरी भाकर मोडीत असत आणि देवाची स्तुती करीत हर्षाने व सालस मनाने जेवत
प्रेषितांची कृत्ये 2:45-46 MACLBSI (पवित्र शास्त्र CL New Testament (BSI))
ते आपापली जमीन व मालमत्ता विकून जसजशी प्रत्येकाला गरज लागत असे, तसतशी सर्वांना वाटून देत असत. ते दररोज मंदिरात एकत्र जमत असत, घरोघरी भाकर मोडत असत आणि आनंदी व विनम्र वृत्तीने अन्न खात असत.
प्रेषितांची कृत्ये 2:45-46 MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
जे कोणी गरजवंत होते, त्यांना देण्यासाठी त्यांनी त्यांच्या जमिनी आणि मालमत्ता विकल्या. दररोज मंदिराच्या अंगणात ते एकत्र जमत होते आणि त्यांच्या घरांमध्ये भाकर मोडीत असत आणि मोठ्या आनंदाने व कृतज्ञ मनाने एकत्र खात होते