प्रेषितांची कृत्ये 25:6-7
प्रेषितांची कृत्ये 25:6-7 पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती (MRCV)
त्यानंतर आठ किंवा दहा दिवस त्यांच्याबरोबर घालविल्यानंतर, फेस्त कैसरीयास खाली गेला. दुसर्याच दिवशी न्यायालय भरवून पौलाला आपल्यासमोर आणावे असा त्याने हुकूम दिला. पौल आत आल्यावर, यरुशलेमहून आलेले यहूदी लोक त्याच्याभोवती उभे राहिले. त्यांनी त्याच्याविरुद्ध अनेक गंभीर असे आरोप लावले, परंतु ते आरोप ते सिद्ध करू शकले नाहीत.
प्रेषितांची कृत्ये 25:6-7 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)
मग तो त्यांच्यामध्ये आठदहा दिवस राहून कैसरीयास खाली गेला आणि दुसऱ्या दिवशी न्यायासनावर बसल्यावर त्याने पौलाला आणण्याचा हुकूम केला. तो आल्यावर यरूशलेम शहराहून आलेल्या यहूद्यांनी त्याच्याभोवती उभे राहून ज्यांचा पुरावा त्यांना देता आला नाही असे पुष्कळ व भयंकर आरोप त्याच्यावर ठेवले.
प्रेषितांची कृत्ये 25:6-7 पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI) (MARVBSI)
मग तो त्यांच्यामध्ये आठ-दहा दिवस राहून कैसरीयास खाली गेला; आणि दुसर्या दिवशी न्यायासनावर बसल्यावर त्याने पौलाला आणण्याचा हुकूम केला. तो आल्यावर यरुशलेमेहून आलेल्या यहूद्यांनी त्याच्याभोवती उभे राहून ज्यांचा पुरावा त्यांना देता आला नाही असे पुष्कळ व भयंकर आरोप त्याच्यावर ठेवले.
प्रेषितांची कृत्ये 25:6-7 पवित्र शास्त्र CL New Testament (BSI) (MACLBSI)
तो त्यांच्यामध्ये आठदहा दिवस राहून कैसरियास गेला. दुसऱ्या दिवशी न्यायासनावर बसल्यावर त्याने पौलला आणण्याचा हुकूम केला. तो आल्यावर यरुशलेमहून आलेल्या यहुदी लोकांनी त्याच्याभोवती उभे राहून ज्यांचा पुरावा त्यांना देता आला नाही असे पुष्कळ गंभीर आरोप त्याच्यावर ठेवले.