प्रेषितांची कृत्ये 3:16
प्रेषितांची कृत्ये 3:16 पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI) (MARVBSI)
त्याच्याच नावावरील विश्वासामुळे त्या नावाने ह्या ज्या माणसाला तुम्ही पाहता व ओळखता त्याला शक्तिमान केले आहे. त्याच्या द्वारे असलेल्या विश्वासाने ह्याला तुम्हा सर्वांसमक्ष ही शरीरसंपत्ती प्राप्त झाली आहे.
प्रेषितांची कृत्ये 3:16 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)
आणि त्याच्या नावाने त्याच्या नावावरील विश्वासाकडून ज्याला तुम्ही पाहता, व ओळखता त्या या मनुष्यास शक्तीमान केले आहे. आणि, त्याच्याद्वारे प्राप्त झालेल्या विश्वासानेच तुम्ही सर्वांच्यादेखत याला हे पूर्ण आरोग्य दिले आहे.
प्रेषितांची कृत्ये 3:16 मराठी समकालीन आवृत्ती (MRCV)
येशूंच्या नावावरील विश्वासामुळे हा माणूस ज्याला आपण पाहता व ओळखता तो आता बलवान झाला आहे. येशूंच्या नावावरील विश्वासाद्वारे तो पूर्ण बरा झालेला आहे, हे तुम्ही सर्वजण पाहतच आहात.
प्रेषितांची कृत्ये 3:16 पवित्र शास्त्र CL New Testament (BSI) (MACLBSI)
त्याच्याच नावावरील विश्वासामुळे व त्याच्याच नावाच्या सामर्थ्याने ज्या माणसाला तुम्ही पाहता व ओळखता त्याला सुदृढ केले आहे. त्याच्यावरील श्रद्धेने ह्याला तुम्हां सर्वांसमक्ष हे स्वास्थ्य प्राप्त झाले आहे.