प्रेषितांची कृत्ये 8:29-31
प्रेषितांची कृत्ये 8:29-31 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)
पवित्र आत्मा फिलिप्पाला म्हणाला, “त्या रथाजवळ जा.” मग फिलिप्प त्या रथाजवळ धावत धावत गेला, तेव्हा त्याने त्यास यशया संदेष्ट्याचा ग्रंथ वाचताना ऐकले, फिलिप्प त्यास म्हणाला, “तुम्ही जे वाचत आहात ते तुम्हास समजते काय?” तो अधिकारी म्हणाला, “मला हे कसे, समजेल कोणीतरी याचा उलगडा करून मला सांगायला हवे?” आणि त्याने फिलिप्पाला रथात चढून आपल्यापाशी बसण्यास बोलावले.
प्रेषितांची कृत्ये 8:29-31 पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती (MRCV)
तेव्हा पवित्र आत्मा फिलिप्पाला म्हणाला, “तू रथ गाठ आणि त्याच्या जवळच चालत राहा.” मग फिलिप्प धावत रथापर्यंत गेला आणि तो खोजा यशायाह संदेष्ट्याचा ग्रंथ वाचीत होता. ते ऐकून त्याने त्याला विचारले, “आपण जे वाचत आहात ते आपणास समजते काय?” तो म्हणाला, “कोणीतरी स्पष्टीकरण करून सांगितल्याशिवाय हे मला कसे समजेल?” म्हणून त्याने फिलिप्पाला विनंती केली की, त्याने रथात चढून त्याच्याजवळ बसावे.
प्रेषितांची कृत्ये 8:29-31 पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI) (MARVBSI)
तेव्हा आत्म्याने फिलिप्पाला सांगितले, “जा, त्याचा रथ गाठ.” फिलिप्प धावत गेला आणि त्याने त्याला यशया संदेष्ट्याचा ग्रंथ वाचताना ऐकले; त्यावर तो म्हणाला, “आपण जे वाचत आहात ते आपल्याला समजते काय?” त्याने म्हटले, “कोणी मार्ग दाखवल्याखेरीज मला कसे समजणार?” मग त्याने फिलिप्पाला आपल्याजवळ येऊन बसण्यास वर बोलावले.
प्रेषितांची कृत्ये 8:29-31 पवित्र शास्त्र CL New Testament (BSI) (MACLBSI)
तेव्हा पवित्र आत्म्याने फिलिपला सांगितले, “तू जाऊन त्याचा रथ गाठ.” फिलिप धावत गेला आणि त्याने त्याला यशया संदेष्ट्याचा ग्रंथ वाचताना ऐकले, त्यावर तो म्हणाला, “आपण जे वाचत आहात ते आपल्याला समजते काय?” त्याने म्हटले, “कोणी मार्ग दाखवल्याखेरीज मला कसे समजणार?” त्याने फिलिपला आपल्याजवळ येऊन बसावयास वर बोलावले.