आमोस 9:13-14
आमोस 9:13-14 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)
परमेश्वर म्हणतो, “असे दिवस येत आहेत की,” नांगरणी करणारा कापणी करणाऱ्याला, द्राक्षे तुडविणारा बी पेरणाऱ्याला, गाठील. आणि पर्वत गोड द्राक्षरस गळू देतील आणि सर्व टेकड्या पाझरतील. मी माझ्या लोकांस, इस्राएलाला, कैदेतून सोडवून परत आणीन, ते उद्ध्वस्त झालेली गावे पुन्हा बांधतील, आणि त्यामध्ये वस्ती करतील. ते द्राक्षांचे मळे लावतील. आणि त्यापासून मिळणारा द्राक्षरस पितील. ते बागा लावतील व त्यापासून मिळणारे पीक खातील.
आमोस 9:13-14 पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती (MRCV)
“ते दिवस येत आहेत,” याहवेह जाहीर करतात, “जेव्हा नांगरणारा कापणी करणार्याला आणि द्राक्षे तुडविणारा बी पेरणार्याला मागे टाकेल. नवीन द्राक्षारस पर्वतांवरून गळू लागेल आणि ते सर्व टेकड्यांवरून वाहू लागेल, मी माझ्या इस्राएली लोकांना बंदिवासातून परत आणेन.
आमोस 9:13-14 पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI) (MARVBSI)
पाहा, परमेश्वर म्हणतो “असे दिवस येत आहेत की नांगरणारा कापणी करणार्याला गाठील व द्राक्षे तुडवणारा बी पेरणार्याला गाठील; डोंगरांवरून नवा द्राक्षारस वाहील व सर्व टेकड्यांना पाझर फुटतील. मी आपल्या सर्व इस्राएल लोकांचा बंदिवास पालटीन; ते ओसाड झालेली नगरे बांधतील व त्यांत वस्ती करतील; ते द्राक्षीचे मळे लावतील व त्यांचा द्राक्षारस पितील; ते बाग लावतील व त्यांची फळे खातील.