दानीएल 12:1
दानीएल 12:1 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)
आणि मीखाएल जो मोठा अधिपती तुझ्या लोकांच्या संतानांसाठी उभा असतो तो त्या समयी उभा राहील; आणि राष्ट्र झाल्यापासून त्या वेळेपर्यंत कधी झाला नाही असा कष्टाचा समय होईल; आणि त्या वेळेस तुझे लोक सोडवले जातील, प्रत्येक जो पुस्तकात लिहिलेला सापडेल तो सोडवला जाईल.
सामायिक करा
दानीएल 12 वाचादानीएल 12:1 पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती (MRCV)
“त्यावेळी तुमच्या लोकांचा रक्षक, समर्थ अधिपती मिखाएलचा उदय होईल. राष्ट्रांच्या सुरुवातीपासून आजतागायत कधीही आलेला नाही असा संकटाचा काळ येईल. परंतु त्यावेळी तुझ्या लोकांपैकी—ज्यांची नावे पुस्तकात नोंदलेली आहेत—त्या सर्वांची मुक्तता होईल.
सामायिक करा
दानीएल 12 वाचादानीएल 12:1 पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI) (MARVBSI)
“त्या समयी तुझ्या लोकांचा कैवार घेणारा मोठा अधिपती जो मीखाएल तो उठेल; कोणतेही राष्ट्र निर्माण झाल्यापासून कधीही आले नाही असे संकट त्या समयी येईल; तुझ्या लोकांपैकी ज्यांची नावे वहीत लिहिलेली आढळतील ते सर्व त्या वेळी मुक्त होतील.
सामायिक करा
दानीएल 12 वाचा