दानीएल 2:27-28
दानीएल 2:27-28 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)
दानीएलाने राजास उत्तर दिले, “राजाचे गुढ प्रकट करण्याची कुशलता, ज्ञानी, व भुतविद्या जाणणारे, जादूगार किंवा ज्योतिषी त्यांच्याकडे नाही. तथापी, एक देव आहे जो स्वर्गात राहतो तो रहस्य प्रगट करतो आणि त्याने भविष्यात होणारी घटना राजा नबुखद्नेस्सर आपणास कळविली आहे. तुम्ही आपल्या बिछान्यात पडले असता तुमचे स्वप्न आणि दृष्टांत तो असा.
दानीएल 2:27-28 पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती (MRCV)
दानीएलने उत्तर दिले, “महाराजांनी ज्या रहस्याबद्दल विचारले, त्याबद्दल कोणीही ज्ञानी मनुष्य, ज्योतिषी, जादूगार किंवा दैवप्रश्न करणारे राजाला या गोष्टी सांगू शकणार नाही, परंतु स्वर्गामधील परमेश्वर गूढ रहस्ये प्रकट करतात. येणार्या दिवसात काय घडणार ते त्यांनीच नबुखद्नेस्सर राजाला दाखविले आहे. तुम्ही आपल्या बिछान्यावर पडले असता तुमचे स्वप्न आणि दृष्टान्त जे तुमच्या मनातून पार झाले ते हे आहेत
दानीएल 2:27-28 पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI) (MARVBSI)
दानिएलाने राजाला उत्तर दिले की, “महाराजांनी जे रहस्य विचारले आहे ते ज्ञानी, मांत्रिक, ज्योतिषी व दैवज्ञ ह्यांना महाराजांना सांगता येणार नाही; तरी रहस्ये प्रकट करणारा देव स्वर्गात आहे आणि त्याने पुढील काळात काय होणार हे नबुखद्नेस्सर महाराजांना कळवले आहे. आपले स्वप्न, आपण बिछान्यावर पडले असता आपल्याला झालेला दृष्टान्त असा आहे