दानीएल 6:26-27
दानीएल 6:26-27 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)
मी असे जाहीर करतो की, माझ्या साम्राज्यातील सर्व लोकांनी कंपीत होऊन दानीएलाच्या देवाचे भय धरावे; कारण तो सर्वकाळ जिवंत देव आहे. त्याचे राज्य अविनाशी आणि त्याचे प्रभूत्व अनंत आहे. तो आम्हास सुरक्षीत करतो, आणि आम्हास सोडवतो. तो स्वर्ग आणि पृथ्वीवर चिन्ह; आणि चमत्कार करतो त्याने दानीएलास सिंहाच्या पंजातून सोडवले.
दानीएल 6:26-27 पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती (MRCV)
“माझ्या राज्याच्या प्रत्येक भागातील लोकांनी दानीएलच्या परमेश्वराचे भय बाळगावे आणि आदर करावा. “कारण ते जिवंत परमेश्वर आहे आणि ते सर्वकाळ टिकणारे आहेत; त्यांच्या राज्याचा कधीच नाश होणार नाही व त्यांचे प्रभुत्व कधीही संपणारे नाही. ते सुटका करतात व ते वाचवितात; ते आकाशात आणि पृथ्वीवर चिन्ह आणि चमत्कार करतात. त्यांनीच दानीएलला सिंहांच्या तावडीतून सोडविले आहे.”
दानीएल 6:26-27 पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI) (MARVBSI)
मी फर्मावतो की माझ्या साम्राज्याच्या सर्व हद्दीतील लोकांनी दानिएलाच्या देवापुढे कंपित होऊन त्याचे भय धरावे; कारण तो जिवंत देव आहे; तो सर्वकाळ जवळ आहे; त्याचे राज्य अविनाशी व त्याचे प्रभुत्व अनंत आहे. ज्याने दानिएलास सिंहांच्या पंजांतून सोडवले तोच बचाव करणारा व मुक्तिदाता आहे; तो आकाशात व पृथ्वीवर चिन्हे व उत्पात घडवणारा आहे.”