अनुवाद 10:12-13
अनुवाद 10:12-13 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)
आता, हे इस्राएल लोकहो! तुम्ही तुमचा देव परमेश्वर याचे भय धरावे, त्याच्या सर्व मार्गांने चालावे, आणि त्याच्यावर प्रीती करावी, आणि तुम्ही आपल्या सर्व हृदयाने आणि आपल्या सर्व जिवाने परमेश्वर तुमचा देव याची सेवा करावी. परमेश्वराच्या आज्ञा आणि त्याचे जे नियम मी आज तुमच्या बऱ्यासाठी तुम्हास आज्ञापिले ते तुम्ही पाळावे, याशिवाय तुमचा देव तुमच्याकडून काय मागतो?
अनुवाद 10:12-13 पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती (MRCV)
आता हे इस्राएली लोकहो, याहवेह तुमचे परमेश्वर तुमच्याजवळ मागतात ते एवढेच की तुम्ही याहवेह तुमच्या परमेश्वराचे भय धरावे, त्यांच्या आज्ञा पाळाव्या, त्यांच्यावर प्रीती करावी आणि पूर्ण मनाने व पूर्ण जिवाने याहवेह तुमच्या परमेश्वराची सेवा करावी, आणि याहवेहच्या ज्या आज्ञा व नियम आज मी तुम्हाला देत आहे, त्या तुमच्या भल्यासाठीच आहेत, त्या तुम्ही पाळाव्या.
अनुवाद 10:12-13 पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI) (MARVBSI)
तर आता हे इस्राएला, तू आपला देव परमेश्वर ह्याचे भय धरावे, त्याच्या सर्व मार्गांनी चालावे, त्याच्यावर प्रीती करावी, पूर्ण मनाने व पूर्ण जिवाने तुझा देव परमेश्वर ह्याची सेवा करावी, आणि परमेश्वराच्या ज्या आज्ञा व विधी मी आज तुझ्या बर्यासाठी सांगत आहे ते तू पाळावेस, तुझा देव परमेश्वर तुझ्यापासून ह्यापेक्षा जास्त काय मागतो?