अनुवाद 11:13-14
अनुवाद 11:13-14 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)
परमेश्वर म्हणतो, ज्या आज्ञा मी आज तुम्हास देत आहे त्यांचे तुम्ही काटेकोरपणे पालन करा. मन:पूर्वक तुमचा देव परमेश्वर याची सेवा करा. त्याच्यावर प्रेम करा. तसे वागलात तर तुमच्या भूमीवर मी योग्यवेळी पाऊस पाडीन. म्हणजे तुम्हास धान्य, नवीन द्राक्षरस, तेल यांचा साठा करता येईल.
अनुवाद 11:13-14 पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती (MRCV)
आज मी तुम्हाला देत असलेल्या या सर्व आज्ञा जर तुम्ही अगदी विश्वासूपणे पाळाल—तुम्ही याहवेह तुमच्या परमेश्वरावर पूर्ण अंतःकरणाने व पूर्ण जिवाने प्रीती कराल व त्यांची सेवा कराल— तर मी आगोठीचा आणि वळवाचा पाऊस योग्य समयी पाठवेन, म्हणजे तुम्हाला धान्य, नवीन द्राक्षे व तेलासाठी जैतुनाच्या तेलाचा साठा करता येईल.
अनुवाद 11:13-14 पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI) (MARVBSI)
मी ज्या आज्ञा आज तुम्हांला देत आहे त्या तुम्ही तत्परतेने ऐकाल आणि आपला देव परमेश्वर ह्याच्यावर प्रेम कराल आणि पूर्ण मनाने व पूर्ण जिवाने त्याची सेवा करीत राहाल, तर मी तुमच्या देशावर आगोटीचा पाऊस आणि वळवाचा पाऊस योग्य समयी पाठवीन; म्हणजे तुला आपले धान्य, द्राक्षारस व तेल ह्यांचा साठा करता येईल.