अनुवाद 30:16
अनुवाद 30:16 पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती (MRCV)
आज मी तुम्हाला आज्ञा देत आहे की तुम्ही याहवेह तुमच्या परमेश्वरावर प्रीती करावी, आज्ञापूर्वक त्यांच्या मार्गात चालावे, आणि त्यांच्या आज्ञा, विधी व नियम पाळावे; म्हणजे तुम्ही जिवंत राहाल व तुमची वृद्धी होईल आणि जी भूमी तुम्ही ताब्यात घेण्यासाठी जात आहात, तिथे याहवेह तुमचे परमेश्वर तुम्हाला आशीर्वादित करतील.
अनुवाद 30:16 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)
तुमच्या परमेश्वर देवावर प्रेम करा, त्याच्या मार्गाने जा व त्याच्या आज्ञा, नियम पाळा अशी माझी तुम्हास आज्ञा आहे. म्हणजे तुम्ही जो प्रदेश आपलासा करायला जात आहात तेथे दीर्घकाळ रहाल, तुमच्या देशाची भरभराट होईल, तुम्हास तुमचा देव परमेश्वर ह्याचे आशीर्वाद मिळतील.
अनुवाद 30:16 पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI) (MARVBSI)
तू आपला देव परमेश्वर ह्याच्यावर प्रीती कर, त्याच्या मार्गांनी चाल आणि त्याच्या आज्ञा, विधी व नियम पाळ, ही आज्ञा आज मी तुला देत आहे; म्हणजे तू जिवंत राहून बहुगुणित होशील आणि जो देश वतन करून घेण्यास तू जात आहेस तेथे तुझा देव परमेश्वर तुला बरकत देईल