अनुवाद 30:9
अनुवाद 30:9 पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती (MRCV)
तेव्हा याहवेह तुमचे परमेश्वर तुमच्या हाताच्या प्रत्येक कार्यात तुम्हाला समृद्धी प्रदान करतील. ते तुम्हाला विपुल संतती, पुष्कळ गुरे आणि तुमच्या भूमीला अमाप पीक देतील. याहवेह तुमच्या पूर्वजांवर जसे प्रसन्न होते, तसेच तुमच्या कल्याणासाठी तुम्हावरही परत प्रसन्न होतील
सामायिक करा
अनुवाद 30 वाचाअनुवाद 30:9 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)
मी तुम्हास सर्व कार्यात यश देईल. त्याच्या आशीर्वादाने तुम्हास भरपूर संतती होईल. गाईना भरपूर वासरे होतील. शेतात भरघोसपीक येईल. तुमचा देव परमेश्वर तुमचे भले करील. तुमच्या पूर्वजांप्रमाणेच तुमचे कल्याण करण्यात त्यास आनंद वाटेल.
सामायिक करा
अनुवाद 30 वाचाअनुवाद 30:9 पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI) (MARVBSI)
तुझा देव परमेश्वर तुझ्या कल्याणासाठी तुझ्या हातचे सर्व काम, तुझ्या पोटचे फळ, तुझ्या गुराढोरांचे वत्स व तुझ्या भूमीचा उपज ह्यांबाबतीत तुझी समृद्धी करील; परमेश्वर जसा तुझ्या पूर्वजांवर प्रसन्न होता तसा तुझ्या कल्याणासाठी तुझ्यावरही पुन्हा प्रसन्न होईल
सामायिक करा
अनुवाद 30 वाचा