अनुवाद 5:13-14
अनुवाद 5:13-14 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)
सहा दिवस तुम्ही श्रम करून आपले सर्व काम करा. पण सातवा दिवस हा तुमचा देव परमेश्वरा ह्याच्या सन्मानार्थ शब्बाथाचा दिवस आहे. म्हणून त्यादिवशी कोणीही काम करता कामा नये. तुम्ही तुमची मुले, मुली, किंवा दासदासी, परके, एवढेच नव्हे तर तुमचे बैल, गाढव इत्यादी पशू यांनी सुद्धा काम करु नये. तुमच्या गुलामांनाही तुमच्या सारखाच विसावा घेता आला पाहिजे.
अनुवाद 5:13-14 पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती (MRCV)
सहा दिवस तुम्ही परिश्रम करावेत आणि आपली सर्व कामे करावी, परंतु सातवा दिवस याहवेह तुमच्या परमेश्वराचा शब्बाथ आहे. त्या दिवशी तुम्ही कोणतेही काम करू नये. तुम्ही किंवा तुमचा पुत्र किंवा कन्या, तुमचा दास किंवा दासी, तुमचे बैल, गाढव, तुमचे पशू किंवा तुमच्या नगरात राहणारा परदेशी, तुमचा दास आणि दासी यांनी देखील तुमच्यासह त्या दिवशी विश्रांती घ्यावी.
अनुवाद 5:13-14 पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI) (MARVBSI)
सहा दिवस श्रम करून आपले सर्व कामकाज कर; पण सातवा दिवस तुझा देव परमेश्वर ह्याचा शब्बाथ आहे; म्हणून त्या दिवशी कोणतेही कामकाज करू नकोस; तू, तुझा मुलगा, तुझी मुलगी, तुझा दास, तुझी दासी, तुझा बैल, तुझे गाढव, तुझा कोणताही पशू अथवा तुझ्या वेशीच्या आत असलेला उपरा ह्यानेही करू नये; म्हणजे तुझ्याप्रमाणे तुझ्या दासदासींनाही विसावा मिळेल.