अनुवाद 8:12-14
अनुवाद 8:12-14 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)
त्यामुळे तुम्हास अन्नधान्याची कमतरता पडणार नाही. तुम्ही चांगली घरे बांधून त्यामध्ये रहाल. तुमची गुरेढोरे आणि शेळ्यामेंढ्या यांची संख्या वाढेल. सोनेरुपे आणि मालमत्ता वाढेल. या भरभराटीने उन्मत्त होऊ नका. आपला देव परमेश्वर याला विसरु नका. मिसरमध्ये तुम्ही गुलाम होता. परंतु मिसरमधून परमेश्वराने तुमची सुटका केली व बाहेर आणले.
अनुवाद 8:12-14 पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती (MRCV)
कारण जेव्हा तुम्ही खाल आणि तृप्त व्हाल, जेव्हा सुंदर घरे बांधाल आणि त्यात वस्ती कराल, आणि जेव्हा तुमची शेरडेमेंढरे व गुरे यांची वृद्धी झालेली असेल आणि तुमचे चांदी आणि सोने व तुमची मालमत्ता वाढलेली असेल, तेव्हा तुमचे अंतःकरण उन्मत्त होईल आणि ज्यांनी तुम्हाला इजिप्त देशाच्या गुलामगिरीतून काढून बाहेर आणले, त्या याहवेह तुमच्या परमेश्वराला तुम्ही विसरून जाल.
अनुवाद 8:12-14 पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI) (MARVBSI)
तू खाऊनपिऊन तृप्त होशील आणि चांगली घरे बांधून त्यांत राहशील, तुझी गुरेढोरे व शेरडेमेंढरे ह्यांची वृद्धी होईल, तुझे सोनेरुपे व तुझी सर्व मालमत्ता वाढेल, तेव्हा तुझे मन उन्मत्त होऊ नये आणि तुझा देव परमेश्वर ज्याने तुला मिसर देशातून, दास्यगृहातून काढून आणले त्याला तू विसरू नयेस म्हणून सांभाळ.