अनुवाद 8:7-9
अनुवाद 8:7-9 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)
तुमचा देव परमेश्वर तुम्हास उत्तम देशात घेऊन जात आहे. ती भूमी सुजला, सुफला आहे. तेथे डोंगरात उगम पावून जमिनीवर वाहणारे नद्या-नाले आहेत. ही जमीन गहू, जव, द्राक्षमळे, अंजीर, डाळिंब यांनी समृद्ध आहे. येथे जैतून तेल, मध यांची रेलचेल आहे. येथे मुबलक धान्य आहे. कोणत्याही गोष्टीची तुम्हास उणीव नाही. येथील दगड लोहयुक्त आहेत. तुम्हास डोंगरातील तांबे खोदून काढता येईल.
अनुवाद 8:7-9 पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती (MRCV)
कारण याहवेह तुमचे परमेश्वर तुम्हाला उत्तम अशा देशात नेणार आहेत—त्यात नद्या, झरे व ओहोळ हे डोंगरात उगम पावून खोर्यांमधून वाहत आहेत; गहू व जव, द्राक्षमळे, अंजिरे व डाळिंबे, जैतुनाचे तेल व मध यांचा तो देश आहे; या देशात भाकरीची उणीव भासणार नाही आणि कशाचीही कमतरता राहणार नाही; तेथील दगड लोहयुक्त आहेत व डोंगरांमधून तांबे खणून काढता येईल.
अनुवाद 8:7-9 पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI) (MARVBSI)
कारण तुझा देव परमेश्वर तुला एका उत्तम देशात घेऊन जात आहे; खोर्यात व डोंगरात उगम पावून पाण्याने भरलेले नाले, झरे व ओढे त्यात वाहत आहेत; गहू, जव, द्राक्षवेली, अंजीर व डाळिंबे ह्यांचा तो देश आहे; तो जैतुनवृक्षांचा आणि मधाचा देश आहे. त्या देशात टंचाई न पडता तू अन्न खाशील, तुला कोणत्याही गोष्टीची वाण पडणार नाही; तेथले धोंडे लोहयुक्त आहेत व तेथल्या डोंगरातून तुला तांबे खणून काढता येईल.