उपदेशक 12:1-2
उपदेशक 12:1-2 पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती (MRCV)
तुझ्या तारुण्याच्या दिवसात तुझ्या निर्माणकर्त्याचे स्मरण कर, आणि जोपर्यंत कष्टाचे दिवस येत नाहीत आणि अशी वर्षे येत नाहीत जेव्हा तुम्ही म्हणाल, “मला त्यांच्यामध्ये काही संतोष नाही”— जोपर्यंत सूर्य आणि प्रकाश, आणि चंद्र आणि तारे अंधकारमय होत नाहीत, पावसानंतर ढग परत जात नाहीत
उपदेशक 12:1-2 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)
तू आपल्या तारुण्याच्या दिवसातसुद्धा आपल्या निर्माणकर्त्याला स्मर. अनर्थाचे दिवस येण्यापूर्वी, आणि तेव्हा अशी वर्षे येण्यापूर्वी तू म्हणशील, त्यामध्ये मला काही सुख नाही. सूर्य, चंद्र आणि तारे यांच्या प्रकाशापूर्वी अंधकार वाढेल आणि पावसानंतर काळोखे ढग परत येतील.
उपदेशक 12:1-2 पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI) (MARVBSI)
आपल्या तारुण्याच्या दिवसांत आपल्या निर्माणकर्त्याला स्मर; पाहा, अनिष्ट दिवस येत आहेत, आणि अशी वर्षे जवळ येत आहेत की, त्यांत “मला काही सुख नाही” असे तू म्हणशील. त्या समयी सूर्य व प्रकाश, चंद्र व तारे अंधुक होतील; आणि पावसानंतर अभ्रे पुन्हा येतील.