उपदेशक 2:24-25
उपदेशक 2:24-25 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)
मनुष्याने खावे, प्यावे आणि श्रम करून आपल्या जिवास सुख द्यावे यापेक्षा त्यास काहीही उत्तम नाही. हे ही देवाच्या हातून घडते असे मी पाहिले. कारण माझ्यापेक्षा कोण उत्तम भोजन करील अथवा कोण देवापासून वेगळे राहून कोणत्या प्रकारचा सुखाचा उपभोग घेईल?
सामायिक करा
उपदेशक 2 वाचाउपदेशक 2:24-25 पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती (MRCV)
खाणे आणि पिणे करून स्वतःच्या कष्टामधून समाधान मिळविणे यापेक्षा मानव अधिक चांगले काय करू शकतो आणि मी पाहतो की, हे सुद्धा परमेश्वराच्याच हातात आहे, कारण परमेश्वराशिवाय कोण उत्तम भोजन करेल व कोणाला आनंदाचा उपभोग घेता येईल?
सामायिक करा
उपदेशक 2 वाचाउपदेशक 2:24-25 पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI) (MARVBSI)
मनुष्याने खावे, प्यावे व श्रम करून आपल्या जिवास सुख द्यावे ह्यापेक्षा त्याला काहीही इष्ट नाही; हेही देवाच्या हातून मिळते असे माझ्या ध्यानात आले. कारण त्याच्या प्रसादाशिवाय खाणेपिणे व सुख भोगणे कोणास प्राप्त होणार?
सामायिक करा
उपदेशक 2 वाचा