उपदेशक 4:9-12
उपदेशक 4:9-12 पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI) (MARVBSI)
एकट्यापेक्षा दोघे बरे; कारण त्यांच्या श्रमांचे त्यांना चांगले फळ प्राप्त होते. त्यांच्यातला एक पडला तर त्याचा सोबती त्याला हात देईल; पण जो एकटा असून पडतो त्याला हात देण्यास कोणी नसते; त्याची दुर्दशा होते. दोघे एकत्र निजले तर त्यांना ऊब येते; एकट्याला ऊब कशी येईल? जो एकटा असतो त्याला कोणी माणूस भारी झाला तर त्याचा प्रतिकार दोघांना करता येईल; तीनपदरी दोरी सहसा तुटत नाही.
उपदेशक 4:9-12 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)
एकापेक्षा काम करणारे दोन माणसे बरी आहेत. कारण त्यांच्या एकत्र श्रमाने ते चांगले वेतन मिळवू शकतात. जर एखादा पडला तर त्याचा दुसरा मित्र त्यास उचलतो. पण जो एकटाच असून पडतो त्यास उचलण्यास कोणी नसते, त्याच्यामागे दुःख येते. आणि जर दोघे एकत्र झोपले तर त्यांना ऊब येऊ शकते. परंतु एकट्याला ऊब कशी काय येऊ शकेल? जो मनुष्य एकटा आहे त्यास कोणी भारी झाला तर त्याचा प्रतिकार दोघांना करता येईल. तीन पदरी दोरी सहसा तुटत नाही.
उपदेशक 4:9-12 पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती (MRCV)
एकापेक्षा दोघेजण बरे! कारण त्यांच्या कष्टाचे अधिक चांगले प्रतिफळ मिळेल: दोघांपैकी एकजण पडला, तर दुसरा त्याला मदत करून उठवेल, परंतु एकजण पडला आणि त्याला उचलण्यास कोणी नसला तर ते दयनीय आहे. जेव्हा दोन व्यक्ती झोपतील तेव्हा ते एकमेकांना ऊब देतील, पण कोणी एकटा असल्यास, त्याला ऊब कशी मिळणार? एकट्या व्यक्तीवर मात करता येते, दोघे स्वतःचा बचाव करू शकतात, तीन पदरी दोर सहजपणे तुटत नाही.