उपदेशक 5:19
उपदेशक 5:19 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)
जर देवाने एखाद्याला संपत्ती, मालमत्ता आणि या गोष्टींचा उपभोग घेण्याची शक्ती दिली असेल तर त्याने त्याचा उपभोग घेतला पाहिजे. त्याच्याकडे ज्या गोष्टी आहेत त्यांचा स्विकार त्याने केला पाहिजे, आणि त्याचे कामही आनंदाने केले पाहिजे. ती देवाने दिलेली भेट आहे.
सामायिक करा
उपदेशक 5 वाचाउपदेशक 5:19 पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI) (MARVBSI)
कोणा मनुष्याला देवाने धनसंपत्ती दिली असेल, तिचा उपभोग घेण्याची, आपला वाटा उचलण्याची व परिश्रम करताना आनंद पावण्याची शक्ती दिली असेल, तर ही देवाची देणगीच समजावी.
सामायिक करा
उपदेशक 5 वाचाउपदेशक 5:19 पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती (MRCV)
आणि याशिवाय परमेश्वराने जर कोणा मनुष्याला संपत्ती आणि तिचा उपभोग घेण्यासाठी आरोग्य दिले असेल, तर त्यांनी त्या परिश्रमात आनंद करावा—हे त्यांना परमेश्वराचे दान आहे. आनंदाने काम करणे व जीवनात जे वाट्याला येईल त्यात समाधान मानणे, ही खरोखर परमेश्वराची देणगी आहे.
सामायिक करा
उपदेशक 5 वाचा