इफिसकरांस पत्र 2:9-10
इफिसकरांस पत्र 2:9-10 पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI) (MARVBSI)
कोणी आढ्यता बाळगू नये म्हणून कर्मे केल्याने हे झाले नाही. आपण सत्कृत्ये करावीत म्हणून ख्रिस्त येशूच्या ठायी निर्माण केलेले असे आपण त्याची हस्तकृती आहोत; ती सत्कृत्ये आचरत आपण आपला आयुष्यक्रम चालवावा म्हणून देवाने ती पूर्वी योजून ठेवली.
इफिसकरांस पत्र 2:9-10 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)
आपल्या कर्मामुळे हे झाले नाही यासाठी कोणी बढाई मारू नये. कारण आम्ही देवाच्या हाताची कृती आहोत जी ख्रिस्तामध्ये आहे जेणेकरूण आम्ही जीवनात चांगली कामे करावी जे देवाने आरंभीच योजून ठेवले होते.
इफिसकरांस पत्र 2:9-10 पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती (MRCV)
कृत्याद्वारे नव्हे; त्यामुळे कोणी गर्व करू शकत नाही. कारण परमेश्वराने पूर्वीच आमच्यासाठी नेमून ठेवलेली चांगली कृत्ये करण्याकरिता आम्ही ख्रिस्त येशूंमध्ये घडविलेली परमेश्वराची हस्तकृती आहोत.
इफिसकरांस पत्र 2:9-10 पवित्र शास्त्र CL New Testament (BSI) (MACLBSI)
कोणी आढ्यता बाळगू नये म्हणून कर्मे केल्याने हे झाले नाही. आपण सत्कृत्ये करावीत म्हणून ख्रिस्त येशूमध्ये आपली निर्मिती करण्यात आली आहे. आपण त्याची हस्तकृती आहोत. ती सत्कृत्ये करीत आपण आपले जीवन जगावे म्हणून देवाने ती पूर्वी योजून ठेवली आहेत.