इफिसकरांस पत्र 4:11-13
इफिसकरांस पत्र 4:11-13 पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI) (MARVBSI)
आणि त्यानेच कोणी प्रेषित, कोणी संदेष्टे, कोणी सुवार्तिक, कोणी पाळक व शिक्षक असे नेमून दिले; ते ह्यासाठी की, त्यांनी पवित्र जनांना सेवेच्या कार्याकरता व ख्रिस्ताच्या शरीराची रचना पूर्णतेस नेण्याकरता सिद्ध करावे. देवाच्या पुत्रावरील विश्वासाच्या व तत्संबंधी परिपूर्ण ज्ञानाच्या एकत्वाप्रत, प्रौढ मनुष्यपणाप्रत, ख्रिस्ताची पूर्णता प्राप्त होईल अशा वृद्धीच्या मर्यादेप्रत आपण सर्व येऊन पोहचू तोपर्यंत दिले
इफिसकरांस पत्र 4:11-13 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)
आणि त्याने स्वतःच काही लोकांस प्रेषित, संदेष्टे, सुवार्तिक, पाळक आणि शिक्षक असे दाने दिली. त्या देणग्या देवाच्या सेवेच्या कार्यास पवित्रजनांना तयार करण्यास व ख्रिस्ताचे शरीर आत्मिकरित्या सामर्थ्यवान होण्यासाठी दिल्या. देवाची ही इच्छा आहे की आपण सगळे विश्वास ठेवणारे एक होऊ कारण आपण त्याच्या पुत्रावर विश्वास ठेवतो आणि आपण उन्नत व्हावे म्हणजे त्याच्याविषयीचे ज्ञान आपणास समजेल, देवाची ही इच्छा आहे की आपण प्रौढ विश्वास ठेवणारे व्हावे, एक होऊन, वाढत ख्रिस्ता सारखे बनावे जो परिपूर्ण आहे.
इफिसकरांस पत्र 4:11-13 मराठी समकालीन आवृत्ती (MRCV)
म्हणून ख्रिस्ताने स्वतः मंडळीला काही प्रेषित, संदेष्टे, सुवार्तिक, पाळक आणि शिक्षक म्हणून दिले, हे यासाठी की त्यांच्या लोकांना सेवेच्या कार्यात सिद्ध करून ख्रिस्ताचे शरीर सुसज्ज व्हावे. जोपर्यंत आपण सर्व विश्वास आणि परमेश्वराच्या पुत्राच्या ज्ञानामध्ये एकता, प्रौढपणा व ख्रिस्ताची परिपूर्णता यापर्यंत पोहोचत नाही तोपर्यंत हे दिले आहे.
इफिसकरांस पत्र 4:11-13 पवित्र शास्त्र CL New Testament (BSI) (MACLBSI)
आणि त्यानेच काहींना प्रेषित, काहींना संदेष्टे, काहींना शुभवर्तमानप्रचारक, काहींना पाळक व शिक्षक असे नेमले. ते ह्यासाठी की, त्यांनी पवित्र लोकांना सेवाकार्याकरिता व ख्रिस्ताच्या शरीराची रचना पूर्णतेस नेण्याकरिता सिद्ध करावे. अशा प्रकारे देवाच्या पुत्रावरील विश्वासाने व त्यासंबंधी परिपूर्ण ज्ञानाने आपण प्रौढ होऊन एकीने जीवन जगू म्हणजे आपण सर्व ख्रिस्ताच्या परिपूर्णतेपर्यंत पोहचू.