इफिसकरांस पत्र 4:14-15
इफिसकरांस पत्र 4:14-15 पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI) (MARVBSI)
ह्यासाठी की, आपण ह्यापुढे बाळांसारखे असू नये, म्हणजे माणसांच्या धूर्तपणाने, भ्रांतीच्या मार्गास नेणार्या युक्तीने, प्रत्येक शिकवणरूपी वार्याने हेलकावणारे व फिरणारे असे होऊ नये. तर आपण प्रीतीने सत्याला धरून मस्तक असा जो ख्रिस्त त्याच्याप्रत सर्व प्रकारे वाढावे.
इफिसकरांस पत्र 4:14-15 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)
ह्यासाठी की आपण यापुढे लहान मुलांसारखे नसावे. म्हणजे मनुष्यांच्या कपटाने, फसवणाऱ्या मार्गाने नेणाऱ्या युक्तीने अशा प्रत्येक नव्या शिकवणरूपी वाऱ्याने तुमचे मार्ग लाटांनी इकडेतिकडे हेलकावणाऱ्या बोटीसारखे होऊ नये; त्याऐवजी आपण प्रेमाने सत्य बोलावे आणि प्रत्येक मार्गाने त्याच्यामध्ये वाढावे जो आमचा मस्तक आहे, ख्रिस्त
इफिसकरांस पत्र 4:14-15 मराठी समकालीन आवृत्ती (MRCV)
आता यापुढे आपण बाळांसारखे असू नये, आणि तर्हेतर्हेच्या शिक्षणरूपी वार्याने, मनुष्यांच्या धूर्तपणाने व कपटाने फसवले जाऊन लाटांनी इकडे तिकडे वाहणारे व हेलकावे खाणारे असे होऊ नये. त्याऐवजी प्रीतीमध्ये सत्य बोलत असताना, आपण प्रत्येक गोष्टींमध्ये ख्रिस्त ज्यांचे मस्तक आहेत, त्यांचे परिपक्व शरीर होण्यासाठी वाढत जावे.
इफिसकरांस पत्र 4:14-15 पवित्र शास्त्र CL New Testament (BSI) (MACLBSI)
त्यामुळे आपण ह्यापुढे लहान मुलांसारखे असू नये, म्हणजे माणसांच्या धूर्तपणाने, चुकीच्या मार्गास नेणाऱ्या युक्तीने, प्रत्येक बदलत्या शिकवणरूपी वाऱ्याने हेलकावणारे व फिरणारे असे होऊ नये. तर आपण प्रीतीने सत्याला धरून, मस्तक असा जो ख्रिस्त, त्याच्यामध्ये सर्व प्रकारे वाढावे.