इफिसकरांस पत्र 5:1-2
इफिसकरांस पत्र 5:1-2 पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI) (MARVBSI)
तर मग देवाची प्रिय मुले ह्या नात्याने तुम्ही त्याचे अनुकरण करणारे व्हा. आणि ख्रिस्ताने तुमच्यावर प्रीती केली आणि देवाला सुवास मिळावा म्हणून स्वत:ला आपल्याकरता अर्पण व यज्ञ म्हणून दिले, त्याप्रमाणे तुम्हीही प्रीतीने चाला.
इफिसकरांस पत्र 5:1-2 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)
तर मग देवाच्या प्रिय मुलांसारखे अनुकरण करणारे व्हा, आणि ख्रिस्तानेही जशी आपल्यावर प्रीती केली आणि देवाला संतुष्ट करणारा सुवास मिळावा म्हणून, आपल्यासाठी ‘अर्पण व बलिदान’ असे स्वतःला दिले, तसे तुम्ही प्रीतीत चाला.
इफिसकरांस पत्र 5:1-2 मराठी समकालीन आवृत्ती (MRCV)
परमेश्वराची प्रिय लेकरे या नात्याने तुम्ही परमेश्वराचा कित्ता गिरवावा. ज्याप्रमाणे ख्रिस्ताने आपल्यावर प्रीती केली आणि स्वतःला आपल्यासाठी सुगंधी अर्पण व यज्ञ म्हणून परमेश्वराला दिले त्याप्रमाणे तुम्हीही प्रीतीच्या मार्गाने चाला.
इफिसकरांस पत्र 5:1-2 पवित्र शास्त्र CL New Testament (BSI) (MACLBSI)
तर मग देवाची प्रिय मुले ह्या नात्याने तुम्ही त्याचे अनुकरण करणारे व्हा. ख्रिस्ताने तुमच्यावर प्रीती केली आणि देवाला सुवास मिळावा म्हणून स्वतःला आपल्याकरिता अर्पण व यज्ञ म्हणून दिले, त्याप्रमाणे तुम्हीही प्रीतीने चाला.