एस्तेर 6:1-2
एस्तेर 6:1-2 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)
त्या रात्री राजाची झोप उडाली. तेव्हा त्याने एका सेवकाला इतिहासाचा ग्रंथ आणण्याची आज्ञा केली आणि मग राजापुढे मोठ्याने वाचण्यात आला. राजा अहश्वेरोशाला राजद्वारावर पहारा करणाऱ्या बिग्थान आणि तेरेश या दोन सेवकांनी राजाचा वध करण्याचा कट रचला होता त्याच्याविषयी मर्दखयाने सांगितले होते अशी नोंद होती.
एस्तेर 6:1-2 पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती (MRCV)
त्या रात्री राजाला झोप येईना, म्हणून त्याने राज्याच्या इतिहासाचा ग्रंथ मागविला, त्याच्या कारकिर्दीचा इतिहास आणण्यात आला व त्याचे वाचन करण्यात येऊ लागले. ग्रंथाचे वाचन चालू असताना, राजवाड्याचे दोन खोजे, द्वाररक्षक बिग्थाना व तेरेश यांनी अहश्वेरोश राजाचा वध करण्याचा कट मर्दखय याने कसा उघडकीस आणला होता, ही संपूर्ण हकिकत नोंदविण्यात आल्याचे कळले.
एस्तेर 6:1-2 पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI) (MARVBSI)
त्या रात्री राजाची झोप उडाली; तेव्हा त्याच्या आज्ञेने इतिहासाचा ग्रंथ आणून लोकांनी त्याच्यापुढे वाचला त्यात हा मजकूर होता : अहश्वेरोश राजाच्या द्वारपाळांपैकी दोन खोजे बिग्थान व तेरेश ह्यांनी राजावर हात टाकण्याचा बेत केल्याची मर्दखयाने खबर दिली.