एस्तेर 8:11
एस्तेर 8:11 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)
राजाने त्या पत्रात सर्व नगरातील यहूद्यांनी एकत्र जमावे आणि स्वसंरक्षणासाठी उभे रहावे; त्यांना जे लोक व प्रांत उपद्रव करतील, त्यांच्या सर्व सैन्याचा, स्त्रियांचा, मुलांचाही नाश करावा व त्यांना ठार मारावे व त्यांना नाहीसे करावे, त्यांची लूट करून घ्यावी.
एस्तेर 8:11 पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती (MRCV)
या फर्मानाद्वारे सर्व नगरात राहत असलेल्या यहूद्यांना आपल्या प्राणाच्या व कुटुंबाच्या रक्षणार्थ एकजूट होण्याची व त्यांचा नाश, कत्तल व नायनाट करण्यासाठी त्यांच्यावर हल्ला करणाऱ्या, कोणत्याही राज्याच्या व प्रांताच्या सशस्त्र लोकांना, त्यांच्या स्त्रिया व लेकरांना नष्ट करून त्यांची घरेदारे घेण्याची परवानगी देण्यात आली.
एस्तेर 8:11 पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI) (MARVBSI)
त्या पत्रांत सर्व नगरांच्या यहूद्यांना परवानगी दिली होती की, ‘तुम्ही एकत्र होऊन आपल्या प्राणांचे संरक्षण करण्यास उभे राहावे आणि ज्या ज्या प्रांतातील लोक जबरदस्त होऊन तुम्हांला, तुमच्या स्त्रियांना व तुमच्या मुलाबाळांना उपद्रव देऊ पाहतील त्यांचा विध्वंस, संहार व नायनाट करावा व त्यांची धनसंपत्ती लुटावी.