निर्गम 10:1-2
निर्गम 10:1-2 पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती (MRCV)
मग याहवेह मोशेला म्हणाले, “फारोहकडे जा, कारण मी त्याचे व त्याच्या अधिकार्यांची मने कठीण केली आहेत, अशासाठी की मी त्यांच्यामध्ये माझे चमत्कार करावे व तुम्हीही आपल्या लेकरांस व नातवंडास मी इजिप्तच्या लोकांशी कसे कठोरपणे वागलो व त्यांच्यामध्ये माझे चमत्कार कसे केले ते सांगावे आणि तुम्हाला समजावे की मी याहवेह आहे.”
निर्गम 10:1-2 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)
नंतर परमेश्वर मोशेला म्हणाला, “तू फारोकडे जा. त्याचे मन व त्याच्या सेवकांची मने मीच कठीण केली आहेत. माझ्या सामर्थ्याची चिन्हे त्यांच्यामध्ये दाखवावी म्हणून मी हे केले. मी मिसऱ्यांना कसे कठोरपणे वागवले आणि त्यांच्यामध्ये अनेक सामर्थ्याची चिन्हे कशी केली हे तुम्ही तुमच्या मुलांना व नातवांना सांगावे म्हणून मी हे केले. या प्रकारे मी परमेश्वर आहे हे तुम्हास कळेल.”
निर्गम 10:1-2 पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI) (MARVBSI)
मग परमेश्वर मोशेला म्हणाला, “फारोकडे जा, कारण मी त्याचे व त्याच्या सेवकांचे मन कठीण केले आहे ते ह्यासाठी की, त्यांच्यामध्ये मी ही आपली चिन्हे प्रकट करावी. मी परमेश्वर आहे हे तुम्हांला कळावे म्हणून मी मिसर्यांची कशी फजिती केली आणि त्यांच्यामध्ये काय काय चिन्हे प्रकट केली ते तुझ्या पुत्रपौत्रांच्या कानी जाऊ दे.”