निर्गम 10:13-14
निर्गम 10:13-14 पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती (MRCV)
तेव्हा मोशेने आपली काठी इजिप्त देशावर उगारली, आणि याहवेहने तो संपूर्ण दिवस व ती संपूर्ण रात्र पूर्वेचा वारा देशावर वाहविला. सकाळपर्यंत वार्याने टोळ आणले. त्यांनी संपूर्ण इजिप्त देश व्यापून टाकला व ते मोठ्या संख्येने देशाच्या प्रत्येक भागात जाऊन राहिले. इतिहासात अशी भयंकर टोळांची पीडा ना कधी आली होती ना पुढे कधी येणार.
निर्गम 10:13-14 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)
मग मोशेने आपल्या हातातील काठी मिसर देशावर उगारली तेव्हा परमेश्वराने एक दिवसभर व रात्रभर पूर्वेकडून वारा वाहविला, तेव्हा सकाळी वाऱ्याबरोबर टोळच टोळ आले. ते उडत आले व अवघ्या मिसर देशभर जमिनीवर पसरले. इतके टोळ ह्यापूर्वी मिसर देशावर कधी आले नव्हते व इतके येथून पुढेही कधी येणार नाहीत.
निर्गम 10:13-14 पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI) (MARVBSI)
मोशेने मिसर देशावर आपली काठी उगारली, तेव्हा परमेश्वराने दिवसभर व रात्रभर देशावर पूर्वेचा वारा वाहवला; आणि सकाळ झाली तेव्हा पूर्वेच्या वार्याबरोबर टोळ आले. सर्व मिसर देशावर टोळांनी धाड घातली आणि ते सर्व देशावर उतरले. ते असंख्य होते. ह्यापूर्वी एवढे टोळ कधी आले नव्हते व ह्यापुढेही कधी येणार नाहीत.