निर्गम 10:21-23
निर्गम 10:21-23 पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती (MRCV)
नंतर याहवेहने मोशेला म्हटले, “तू आपला हात वर आकाशाकडे लांब कर, म्हणजे इजिप्त देशावर अंधार पडेल—इतका अंधार की त्याला लोक चाचपडतील.” तेव्हा मोशेने आपला हात आकाशाकडे लांब केला, आणि तीन दिवसांसाठी निबिड अंधकाराने संपूर्ण इजिप्त देश व्यापून टाकला. कोणी कोणाला पाहू शकत नव्हते व तीन दिवस कोणी आपल्या ठिकाणाहून हलला नाही, परंतु जिथे इस्राएली लोक राहत होते तिथे मात्र प्रकाश होता.
निर्गम 10:21-23 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)
मग परमेश्वराने मोशेला सांगितले, “तू आपला हात आकाशात उंच कर म्हणजे अवघा मिसर देश अंधारात गडप होईल तो अंधार इतका दाट असेल की तुम्हास चाचपडत जावे लागेल.” तेव्हा मोशेने आपला हात आकाशाकडे उभारिला आणि तीन दिवस सर्व मिसर देशात निबिड अंधकार झाला. कोणालाही काहीही दिसेना आणि म्हणून कोणीही उठून तीन दिवस आपले घर सोडून गेले नाही; परंतु जिथे इस्राएली लोकांची वस्ती होती तेथे प्रकाश होता.
निर्गम 10:21-23 पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI) (MARVBSI)
मग परमेश्वराने मोशेला सांगितले, “आकाशाकडे आपला हात उगार म्हणजे मिसर देशावर अंधार पडेल, इतका की तो हाताला लागेल.” तेव्हा मोशेने आपला हात आकाशाकडे उगारला, आणि तीन दिवस सर्व मिसर देशभर निबिड अंधार पसरला. तीन दिवस कोणी कोणाला दिसेना की कोणी आपले ठिकाण सोडून हालेना; पण इस्राएल लोकांच्या सगळ्या वस्तीत उजेड होता.