निर्गम 12:12-13
निर्गम 12:12-13 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)
आज रात्री मी मिसर देशात फिरेन आणि त्यातील मनुष्य व पशू या सर्वांचे प्रथम जन्मलेले मी मारून टाकीन, आणि मिसर देशातील सर्व दैवतांना शिक्षा करीन. मी परमेश्वर आहे. परंतु तुमच्या घरांच्या दारावरील रक्त ही एक खूण असेल. मी जेव्हा रक्त पाहीन तेव्हा तुम्हास ओलांडून मी पुढे जाईन. मी मिसर देशाला मारीन तेव्हा कोणताही अनर्थ तुम्हावर येणार नाही व तुमचा नाश होणार नाही
निर्गम 12:12-13 पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती (MRCV)
“कारण त्याच रात्री मी संपूर्ण इजिप्त देशामधून संचार करेन व सर्व मनुष्यांचे व जनावरांचे प्रथमवत्स मारून टाकेन आणि त्यांच्या सर्व दैवतांवर न्याय आणेन; मी याहवेह आहे. तुम्ही राहत असलेल्या घरांच्या दारांवर असलेले रक्त हे तुमच्याकरिता चिन्ह असेल, जेव्हा मी ते रक्त पाहीन, तेव्हा मी तुम्हाला ओलांडून पुढे जाईन. जेव्हा मी इजिप्तला तडाखा देईन, तेव्हा कोणतीही विनाशी पीडा तुम्हाला स्पर्श करणार नाही.
निर्गम 12:12-13 पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI) (MARVBSI)
कारण ह्या रात्री मिसर देशात फिरून त्यातील मनुष्य व पशू ह्या सर्वांचे प्रथमजन्मलेले मी मारून टाकीन आणि मिसर देशातील सर्व देवांचे शासन करीन; मी परमेश्वर आहे. आणि ज्या घरात तुम्ही असाल त्या घरात ते रक्त तुमच्याकरता खूण असे होईल. आणि जेव्हा मी रक्त पाहीन तेव्हा मी तुम्हांला ओलांडून जाईन. मिसर देशाच्या लोकांना मी मारीन तेव्हा तुमच्यावर अनर्थ येणार नाही, तुमचा नाश होणार नाही.