निर्गम 12:26-27
निर्गम 12:26-27 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)
जेव्हा तुमची मुलेबाळे तुम्हास विचारतील की या उपासनेचा अर्थ काय आहे? तेव्हा तुम्ही त्यांना सांगा, हा परमेश्वराच्या वल्हांडणाचा यज्ञ आहे; कारण आम्ही जेव्हा मिसरमध्ये होतो तेव्हा त्या दिवशी परमेश्वराने मिसराच्या लोकांस मारले व आपल्या घरांना वाचवले त्या वेळी तो मिसरातील इस्राएलांची घरे ओलांडून गेला, हे ऐकून लोकांनी नतमस्तक होऊन दंडवत घातले.
निर्गम 12:26-27 पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती (MRCV)
जेव्हा तुमची लेकरे तुम्हाला विचारतील, ‘या विधीचा अर्थ काय आहे?’ तेव्हा त्यांना सांगा, ‘हा याहवेहसाठी वल्हांडणाचा यज्ञ आहे, ज्यांनी इजिप्तच्या लोकांचा संहार करून त्यांचा नाश केला, आणि इस्राएली लोकांची घरे ओलांडून गेले आणि आम्हाला वाचविले.’ ” तेव्हा लोकांनी आपली मस्तके नमवून त्यांना नमन केले व त्यांची आराधना केली.
निर्गम 12:26-27 पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI) (MARVBSI)
तुमची मुलेबाळे तुम्हांला विचारतील की, ह्या सेवेचा अर्थ काय? तेव्हा तुम्ही सांगा की, हा परमेश्वराच्या वल्हांडणाचा यज्ञ आहे; त्याने मिसरी लोकांना मारले व आमच्या घरांचा बचाव केला त्या समयी तो मिसरातील इस्राएलांची घरे ओलांडून गेला.” हे ऐकून लोकांनी मस्तके लववून दंडवत घातले.