निर्गम 20:9-10
निर्गम 20:9-10 पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती (MRCV)
सहा दिवस तुम्ही परिश्रम करावेत आणि आपली सर्व कामे करावी. परंतु सातवा दिवस याहवेह तुमचे परमेश्वर यांचा शब्बाथ आहे. त्या दिवशी तुम्ही कोणतेही काम करू नये, तुम्ही किंवा तुमचा पुत्र किंवा कन्या, तुमचा दास किंवा दासी, तुमचे पशू किंवा तुमच्या नगरात राहणारा परदेशी यांनी देखील कोणतेही काम करू नये.
निर्गम 20:9-10 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)
सहा दिवस श्रम करून तू तुझे कामकाज करावेस; परंतु सातवा दिवस तुझा देव परमेश्वर याचा शब्बाथ आहे, म्हणून त्या दिवशी तू, तुझा पुत्र, तुझी कन्या, तुझे दास व दासी यांनी तसेच तुझे पशू, किंवा तुझ्या वेशीत राहणाऱ्या परकीयांनीही कोणतेही कामकाज करु नये
निर्गम 20:9-10 पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI) (MARVBSI)
सहा दिवस श्रम करून आपले सर्व कामकाज कर; पण सातवा दिवस तुझा देव परमेश्वर ह्याचा शब्बाथ आहे, म्हणून त्या दिवशी कोणतेही कामकाज करू नकोस; तू, तुझा मुलगा, तुझी मुलगी, तुझा दास, तुझी दासी, तुझी गुरेढोरे व तुझ्या वेशीच्या आत असलेला उपरा, ह्यांनीही करू नये