निर्गम 31:2-5
निर्गम 31:2-5 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)
“पाहा, यहूदा वंशातील उरीचा मुलगा म्हणजे हूरचा नातू बसालेल याला मी निवडून घेतले आहे. देवाच्या आत्म्याने त्यास परिपूर्ण भरले आहे; आणि सर्व प्रकारची कामे करण्यासाठी मी त्यास अक्कल, बुद्धी व ज्ञान ही दिली आहेत. तो सोने, चांदी व पितळ यांच्या कलाकुसरीचे काम करील. तो रत्नांना सुंदर पैलू पाडील व हिरे जडवून देईल; तो लाकडावरील कोरीव कामही करील; आणि अशा सर्व प्रकारची कलाकुसरीची कामे करील.
निर्गम 31:2-5 पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती (MRCV)
“पाहा, मी यहूदाहच्या गोत्रातील, हूराचा पुत्र उरी याचा पुत्र बसालेल याला निवडले आहे. व मी त्याला परमेश्वराचा आत्मा, ज्ञान, समज, बुद्धी आणि सर्वप्रकारच्या कुशलतेने भरले आहे— सोने, चांदी आणि कास्याचे कलाकौशल्य करण्यासाठी; आणि पाषाण फोडून रत्ने घडवावी, लाकडाचे काम आणि सर्वप्रकारचे कलात्मक कारागिरीचे काम करण्यासाठी.
निर्गम 31:2-5 पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI) (MARVBSI)
“पाहा, मी यहूदा वंशातील ऊरीचा मुलगा म्हणजे हूरचा नातू बसालेल ह्याला त्याच्या नावाने बोलावले आहे, मी त्याला देवाच्या आत्म्याने परिपूर्ण करून त्याला अक्कल, बुद्धी, ज्ञान आणि सर्व प्रकारचे कसब दिले आहे. तो कलाकुसरीची कामे करील; सोने, चांदी व पितळ ह्यांची कामे करील. जडवण्यासाठी रत्नांना पैलू पाडील, लाकडाचे नक्षीकाम करील; आणि अशी सर्व प्रकारची कारागिरीची कामे करील.