निर्गम 33:16-17
निर्गम 33:16-17 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)
तसेच तुझी कृपादृष्टी माझ्यावर व तुझ्या लोकांवर झाली आहे हे कशावरून समजावे? जर तू आमच्याबरोबर आल्याने मी व हे तुझे लोक पृथ्वीवरील इतर सर्व लोकांहून वेगळे झालो आहो यावरूनच ते समजायचे ना?” मग परमेश्वर मोशेला म्हणाला, “तू मागतोस त्याप्रमाणे मी करीन, कारण माझी कृपादृष्टी तुझ्यावर झाली आहे आणि मी व्यक्तीशः तुला तुझ्या नावाने ओळखतो.”
निर्गम 33:16-17 पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती (MRCV)
तुम्ही आम्हाबरोबर आला नाही, तर माझ्यावर आणि आपल्या लोकांवर तुमची कृपादृष्टी झाली आहे की नाही हे कसे कळणार? मी व तुमचे लोक पृथ्वीवरील इतर सर्व लोकांपासून वेगळे आहोत हे कसे समजणार?” यावर याहवेहने मोशेला म्हटले, “जी गोष्ट तू माझ्याकडे मागितली आहे तीच मी करेन, कारण तुझ्यावर मी संतुष्ट आहे आणि मी तुला नावाने ओळखतो.”
निर्गम 33:16-17 पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI) (MARVBSI)
तुझी कृपादृष्टी माझ्यावर व तुझ्या प्रजेवर झाली आहे हे कशावरून समजावे? तू आमच्याबरोबर आल्याने मी व तुझे प्रजाजन पृथ्वीवरील इतर सर्व लोकांपेक्षा वेगळे झालो आहोत ह्यावरूनच ते समजायचे ना?” मग परमेश्वर मोशेला म्हणाला, “हे जे तू सांगितले आहेस तेही मी करीन; कारण माझी कृपादृष्टी तुझ्यावर झाली आहे आणि मी तुला व्यक्तिश: नावाने ओळखत आहे.”