निर्गम 35:30-31
निर्गम 35:30-31 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)
तेव्हा मोशे इस्राएल लोकांस म्हणाला, पाहा, परमेश्वराने यहूदा वंशातील ऊरीचा पुत्र म्हणजे हूराचा नातू बसालेल ह्याला नाव घेऊन बोलावले आहे. आणि त्याने त्यास देवाच्या आत्म्याने परिपूर्ण करून अक्कल, बुध्दी, ज्ञान आणि सर्व प्रकारचे कसब दिले आहे.
सामायिक करा
निर्गम 35 वाचानिर्गम 35:30-31 पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती (MRCV)
मग मोशे इस्राएली लोकांना म्हणाला, “पाहा, याहवेहने यहूदाहच्या गोत्रातील, हूराचा पुत्र, उरी याचा पुत्र बसालेल याला निवडले आहे, आणि याहवेहने त्याला परमेश्वराचा आत्मा, ज्ञान, समज, बुद्धी आणि सर्वप्रकारच्या कुशलतेने भरले आहे
सामायिक करा
निर्गम 35 वाचानिर्गम 35:30-31 पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI) (MARVBSI)
मग मोशे इस्राएल लोकांना म्हणाला, “पाहा, यहूदा वंशातील ऊरीचा मुलगा म्हणजे हूराचा नातू बसालेल ह्याला परमेश्वराने नाव घेऊन बोलावले आहे; आणि त्याने त्याला देवाच्या आत्म्याने परिपूर्ण करून अक्कल, बुद्धी, ज्ञान आणि सर्व प्रकारचे कसब दिले आहे
सामायिक करा
निर्गम 35 वाचा