निर्गम 7:3-4
निर्गम 7:3-4 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)
परंतु मी फारोचे मन कठोर करीन. मग मी मिसर देशामध्ये आपल्या सामर्थ्याची अनेक चिन्हे व अनेक आश्चर्ये दाखवीन. तरीही फारो तुमचे काही ऐकणार नाही. तेव्हा मग मी आपला हात मिसरावर चालवीन आणि त्यास जबर शिक्षा करून मी आपली सेना, माझे लोक, इस्राएल वंशज यांना मिसर देशातून काढून आणीन.
सामायिक करा
निर्गम 7 वाचानिर्गम 7:3-4 पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती (MRCV)
पण मी फारोहचे हृदय कठीण करेन आणि इजिप्तमध्ये जरी मी माझी चिन्हे व चमत्कार बहुगुणित करेन, तरीही फारोह तुझे ऐकणार नाही. मग मी इजिप्तवर माझा हात उगारेन आणि मोठ्या पराक्रमी कृत्यांच्या न्यायाने मी माझे सैन्य, माझे इस्राएली लोक यांना बाहेर काढेन.
सामायिक करा
निर्गम 7 वाचानिर्गम 7:3-4 पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI) (MARVBSI)
मी फारोचे मन कठोर करीन आणि मिसर देशात माझी चिन्हे व अद्भुते विपुल दाखवीन. तरी फारो तुमचे काही ऐकणार नाही. मग मी मिसरावर आपला हात टाकीन आणि त्यांना मोठ्या शिक्षा करून मी माझ्या सेना, माझे लोक, इस्राएलवंशज ह्यांना मिसर देशातून बाहेर काढीन.
सामायिक करा
निर्गम 7 वाचा