निर्गम 7:9-10
निर्गम 7:9-10 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)
“फारो तुम्हास एखादा चमत्कार दाखविण्याविषयी विचारील तेव्हा अहरोनाला आपली काठी फारोच्या देखत जमिनीवर टाकावयास सांग म्हणजे तिचा साप होईल.” तेव्हा मोशे व अहरोन फारोकडे गेले आणि परमेश्वराने आज्ञा केल्याप्रमाणे त्यांनी केले. अहरोनाने आपली काठी फारो व त्याचे सेवक यांच्यापुढे टाकली आणि त्या काठीचा साप झाला.
निर्गम 7:9-10 पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती (MRCV)
“जेव्हा फारोह तुम्हाला म्हणेल, ‘चमत्कार करून दाखवा,’ तेव्हा अहरोनास सांग, ‘तुझी काठी घे आणि फारोहसमोर खाली टाक,’ आणि तिचा साप होईल.” मग मोशे व अहरोन फारोहकडे गेले व याहवेहने त्यांना सांगितल्याप्रमाणेच केले. अहरोनाने आपली काठी फारोहसमोर व त्याच्या सेवकांसमोर खाली जमिनीवर टाकली आणि तिचा साप झाला.
निर्गम 7:9-10 पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI) (MARVBSI)
“‘तुम्ही स्वत: काही अद्भुत कृती दाखवा’ असे फारो तुम्हांला म्हणेल तेव्हा तू अहरोनाला सांग, ‘आपली काठी घेऊन फारोपुढे टाक म्हणजे तिचा साप होईल.”’ मग मोशे व अहरोन ह्यांनी फारोजवळ जाऊन परमेश्वराच्या आज्ञेप्रमाणे केले; अहरोनाने आपली काठी फारो व त्याचे सेवक ह्यांच्यापुढे टाकली तेव्हा तिचा साप झाला.