यहेज्केल 38:16
यहेज्केल 38:16 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)
“तू माझ्या लोकांशी, इस्राएलशी, लढण्यास येशील. तू देशाला व्यापणाऱ्या व प्रचंड गर्जना करणाऱ्या ढगाप्रमाणे येशील. शेवटच्या दिवसात माझ्या देशाशी लढावयास मी तुला आणिन. मग, गोग, राष्ट्रांना माझे सामर्थ्य कळून येईल. ते मला मान देतील. त्यांना कळून चुकेल की मी पवित्र आहे.”
सामायिक करा
यहेज्केल 38 वाचायहेज्केल 38:16 पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती (MRCV)
मेघांनी देशाला झाकून टाकावे, तसे तू माझ्या इस्राएली लोकांवर हल्ला करशील. येणार्या दिवसांत, हे गोग, मी तुला माझ्या देशाच्या विरुद्ध आणेन, म्हणजे तुझ्याद्वारे राष्ट्रांच्या दृष्टीत जेव्हा मी पवित्र मानला जाईल तेव्हा ते मला जाणतील.
सामायिक करा
यहेज्केल 38 वाचायहेज्केल 38:16 पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI) (MARVBSI)
अभ्राने देश झाकावा तसा तू माझे लोक इस्राएल ह्यांच्यावर चाल करून येशील; हे गोगा, शेवटल्या दिवसांत असे घडेल की मी राष्ट्रांदेखत तुझ्या द्वारे आपली पवित्रता प्रकट करीन, तेव्हा राष्ट्रांनी मला ओळखावे म्हणून मी तुला माझ्या देशावर आणीन.
सामायिक करा
यहेज्केल 38 वाचा